धोकादायक विद्युत खांब बदलण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:36+5:302021-02-05T08:17:36+5:30

उमरगा : शहरातील न्यू बालाजीनगर भागातील राममंदिररोडवरील विद्युत खांब सध्या धोकादायक स्थितीत उभा असून, तो बदलण्याबाबत अनेकदा विनंती करूनही ...

Ignoring the replacement of dangerous electrical poles | धोकादायक विद्युत खांब बदलण्याकडे दुर्लक्ष

धोकादायक विद्युत खांब बदलण्याकडे दुर्लक्ष

उमरगा : शहरातील न्यू बालाजीनगर भागातील राममंदिररोडवरील विद्युत खांब सध्या धोकादायक स्थितीत उभा असून, तो बदलण्याबाबत अनेकदा विनंती करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांमधून केली जात आहे. उमरगा येथील बालाजीनगर भगत राममंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा विद्युत खांब गेली दहा वर्षांपासून याच अवस्थेत उभा आहे. या बाबत वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करण्यात आलेली आहे. हा विद्युत खांब काढून या ठिकाणी दुसरा खांब बसवण्यासाठी ठरावही घेण्यात आले. परंतु, त्यावर पुढे कुठलीच कार्यवाही झाली नाही. सध्या या पोलच्या तारा जमिनी लगत आलेल्या असून, रस्त्याचे कामदेखील चालू आहे. त्यामुळे रस्ता काम पूर्ण होण्याअगोदर हा खांब बदलावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांमधून केली जात आहे.

Web Title: Ignoring the replacement of dangerous electrical poles