संचिकेत फेरफार ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : नगरपरिषद कार्यालयातील संचिकेत फेरफार केल्याप्रकरणी येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पालिकेतील लिपिक सादीक बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगरपरिषद कार्यालयातील घर क्र. २७/८५ या संचिकेतील कागदपत्रात अज्ञाताने सन २००१ ते २०१७ या कालावधीत लपूनछपून अतिरिक्त मजकूर लिहून मूळ लिखाणात फेरफार केला. या फिर्यादीवरून भादंसं ४२०, ४६५, ४६८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भूखंडावर अतिक्रमण ; एकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : भूखंडावर अतिक्रमण केल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील राहणाऱ्या मीरा देशपांडे यांचा कळंब तालुक्यातील सावरगाव (पुनर्वसन) येथे भूखंड आहे. यावर शिवाजी नगर कळंब येथील विनायक माने यांनी २ जुलै पूर्वी कुंपण करून अतिक्रमण केले. याप्रकरणी मीरा देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भादंस ४४७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.