आरळीत ग्रामरत्नांचा कौतुक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:05+5:302021-07-14T04:38:05+5:30

तुळजापूर : तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आरळी (बु.) येथील विविध पदांवर निवड झालेल्या ग्रामरत्नांचा सन्मान सोहळा पार पडला. या ...

Gramratna appreciation ceremony in Arali | आरळीत ग्रामरत्नांचा कौतुक सोहळा

आरळीत ग्रामरत्नांचा कौतुक सोहळा

तुळजापूर : तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आरळी (बु.) येथील विविध पदांवर निवड झालेल्या ग्रामरत्नांचा सन्मान सोहळा पार पडला.

या नागरी सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादीच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेले अनिल पारवे, सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले किरण व्हरकट, वीरशैव लिंगायत संघर्ष समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले मेजर लक्ष्मण उळेकर, तुळजापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेले रामचंद्र गिड्डे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच गोविंद पारवे, चेअरमन अनिल जाधव, सहायक फौजदार संजय पारवे, अरुण जोत, पोलीस पाटील युवराज पाटील, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, ग्रा. पं. सदस्य भीमराव सोनवणे, संजय पाटील, दादाराव पारवे, ॲड. फारूक शेख, राहूल पौळ, शेखर उकरंडे, धनाजी धोतरकर, तानाजी व्हरकट, भास्कर पारवे, रामचंद्र पारवे, बजरंग कोकाटे, माजी सैनिक शेकुंबर शेख, बापूसाहेब वायकर, जनार्धन व्हरकट, संदेश माने, संजय गवळी, प्रशांत व्हरकट, मकरंद बामनकर, नागेश तानवडे, राम शीतळकर, लक्ष्मण कचरे, मोहन बंडगर, प्रा. प्रशांत उकरंडे, दगडू क्षीरसागर, सुधाकर कदम, लिंबन पारवे, बाबूराव कोळी, विठ्ठल बंडगर, भगवान कचरे, विक्रम व्हरकट, जालिंदर माने, विकास जोत, प्रभाकर उळेकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Gramratna appreciation ceremony in Arali