जुगार अड्ड्यावर छापा, मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:44+5:302021-07-07T04:40:44+5:30
१६८ चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५ जुलै राेजी जिल्हाभरातील १८ पाेलीस ठाणी व ...

जुगार अड्ड्यावर छापा, मुद्देमाल जप्त
१६८ चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ५ जुलै राेजी जिल्हाभरातील १८ पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून सुमारे १६८ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ३४ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवली जाणार आहे. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, ४७ कारवाया
उस्मानाबाद : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी वावरताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक केले आहे. हा मनाई आदेश झुगारल्या प्रकरणी ५ जुलै राेजी ४७ कारवाया करण्यात आल्या. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ९ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रहदारीस धाेका निर्माण केला, गुन्हा दाखल
उस्मानाबाद : परंडा येथील रणजित अंकुश गाेरे यांनी ५ जुलै राेजी छत्रपती काॅॅम्प्लेक्ससमाेरील रस्त्यावर रहदारीस धाेका निर्माण हाेईल अशा रीतीने जीप उभी केली. ही बाब समाेर आल्यानंतर परंडा पाेलिसांनी गाेरे यांच्याविरुद्ध भादंसंचे कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.