फरशी खचली; परिसरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:03+5:302021-02-07T04:30:03+5:30

फोटो (६-२) दत्ता पवार येडशी : येथील पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखान्यात पाच खोल्या असून, या सर्वच ठिकाणची फरशी खचली आहे, ...

The floor is crumbling; The realm of dirt in the area | फरशी खचली; परिसरात घाणीचे साम्राज्य

फरशी खचली; परिसरात घाणीचे साम्राज्य

फोटो (६-२) दत्ता पवार

येडशी : येथील पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखान्यात पाच खोल्या असून, या सर्वच ठिकाणची फरशी खचली आहे, शिवाय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने कमालीची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्या डागडुजीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

येथील लातूर रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ दवाखान्याची इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी निवास बांधण्यात आले आहेत. यात दवाखान्यासाठी ५ खोल्या उपलब्ध असून, या पाचही खोल्यांमधील फरशी व पायऱ्या खचल्या आहेत. फरशी खचल्याने येथे अनेकदा साप निघाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

दवाखान्याच्या आसपास नालीची सोय नाही. त्यामुळे या भागातील घाण पाणी जमिनीत मुरून ते दवाखान्याच्या आवारात येत आहे, शिवाय परिसरातील काही नागरिक दवाखान्याच्या आवारातच शौचास बसतात. यामुळेही येेथे कमालीची दुर्गंधी पसरत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेटी देऊन जनावरांना उपचाराबरोबर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन करीत आहेत, परंतु येथे मात्र बाह्यरूप व परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू असले, तरी अंतर्गत भागाची प्रचंड दुरवस्था दिसून येत आहे. त्यामुळे येथील फरशी दुरुस्ती करून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The floor is crumbling; The realm of dirt in the area