शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत पाच अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

गुणवंत जाधवर उमरगा : सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती असतानाही महिला अत्याचाराच्या किळसवाण्या आणि घृणास्पद घटनांची मालिका मात्र सुरूच आहे. ...

गुणवंत जाधवर

उमरगा : सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती असतानाही महिला अत्याचाराच्या किळसवाण्या आणि घृणास्पद घटनांची मालिका मात्र सुरूच आहे. तालुक्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही. घराबाहेर आणि उंबऱ्याच्या आतही ‘ती’ सुरक्षित नसल्याचे वास्तव पोलीस दप्तरी नोंद असलेल्या अत्याचाराच्या आकडेवारीतून समोर येत आहे. तालुक्यात आठ महिन्यांत ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

यावर्षी सुरुवातीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिने कडक निर्बंध लागू होते. यामुळे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. बहुतांश प्रकरणांत आरोपी हे पीडितेच्या ओळखीतले आहेत. आमिष दाखवून, तसेच पळवून नेऊन अत्याचार केल्याची प्रकरणे अधिक आहेत. विशेष म्हणजे विनयभंगाचे प्रकारही झाले आहेत. चालू वर्षी आठ महिन्यांत अपहरणाचे ५ गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराला पायबंद घालण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे. महिलांच्या तक्रारी संवेदनशीलपणे व गांभीर्याने घेतल्या जातात. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जलद तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले जाते. मात्र, बहुतांश प्रकरणांत आरोपी ओळखीचे असतात किंवा काही वेळा प्रेम प्रकरणांतूनही तक्रारी दाखल होत असल्याचे आढळून येते.

गतवर्षीच्या तुलनेत घट

उमरगा तालुक्यात गतवर्षी २०२० मध्ये अत्याचाराचे ५, तर अपहरणाचे ८ गुन्हे दाखल होते. यंदा मात्र अत्याचाराचा एकही गुन्हा नसून अपहरणाचा आकडा ५ झाला आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत बलात्कार व अपहरणाचे प्रकार कमी झाले आहेत.

गतवर्षी १३ गुन्हे झाले होते दाखल

अल्पवयीन मुलींवर अत्याचार आठ महिन्यांतील एकूण अत्याचाराची ५ प्रकरणे झाली आहेत. या सर्व मुली अल्पवयीन आहेत. या प्रकरणांपैकी ४ मुली १६ वर्षे वयाच्या, तर एक मुलगी १७ वर्षे वयाची आहे. या सर्व प्रकरणांत अल्पवयीन मुली पीडित आहेत. गतवर्षी १३ मुली वासनेच्या शिकार ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुले-मुली जास्त प्रमाणात घराबाहेर पडत नाहीत. शिवाय, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पालकांची मानसिकतादेखील बदलली असून, यातूनच तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नदेखील झाल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील आकडेवारी

महिना बलात्कार अपहरण

जानेवारी निरंक निरंक

फेब्रुवारी निरंक १

मार्च निरंक १

एप्रिल निरंक २

मे निरंक निरंक

जून निरंक निरंक

जुलै निरंक निरंक

ऑगस्ट निरंक १

कोट....

८० टक्के गुन्ह्याची उकल

उमरगा तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत अपहरणाचे ५ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ४ गुन्ह्यांची उकल करण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या केवळ एका अपहरण गुन्ह्याची उकल अद्याप बाकी आहे. चालू वर्षीच्या ८० टक्के गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.

- मुकुंद आघाव, पोलीस निरीक्षक, उमरगा