मंदिर बंद असल्याने आर्थिक गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:25+5:302021-07-25T04:27:25+5:30

पाळीकर पुजारी मंडळाचे निवेदन तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद असल्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या विविध घटकांचे आर्थिक गणित ...

The financial maths deteriorated as the temple was closed | मंदिर बंद असल्याने आर्थिक गणित बिघडले

मंदिर बंद असल्याने आर्थिक गणित बिघडले

पाळीकर पुजारी मंडळाचे निवेदन

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद असल्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या विविध घटकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी येथील पाळीकर पुजारी मंडळाने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्ह्याधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली.

श्री तुळजाभवानी मंदिर कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या पाळीकर, सोळाआणे पुजारी, उपाध्ये, सेवेदारी व मंदिराशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांचे आर्थिक गणित बिघडले आहे, तसेच राज्यातील व परराज्यातील अनेक देवी भाविक महाद्वारातून दर्शन घेऊन जातात. त्यामुळे पुजारी व भाविकांच्या धार्मिक भावनांचा विचार करून, मंदिर विश्वस्तांची बैठक घेऊन मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा व तसा ठराव राज्य सरकारला पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मंदिरच्या सर्व विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत. यावर उपाध्यक्ष बिपीन शिंदे यांची स्वाक्षरी आहे.

Web Title: The financial maths deteriorated as the temple was closed