शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी ...

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पटेल म्हणाले, दगडी कोळसा वापरून सध्या वीजनिर्मिती केली जाते. यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. याऐवजी बांबू, धानाचा भुसा व कपाशीची लाकडे वीजनिर्मितीसाठी वापरल्यास थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये तर कार्बनचे उत्सर्जन कमी होईलच, शिवाय पर्यावरण संतुलनासाठीदेखील फायदा होईल. बांबूपासून इथेनॉलनिर्मितीही होते. पेट्रोल-डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, त्यासाठी पर्याय म्हणून इथेनॉल आहे. बांबूचे एक झाड एका वर्षाकाठी ३०० किलो ऑक्सिजन निर्माण करते, तर एका माणसाला २८० किलो ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे बांबू हा उपयोगी वृक्ष आहे. प्लास्टिक, लोखंड, सिमेंट यासारख्या वस्तूच्या वापराला बांबू हा पर्याय आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चीतंपल्ली येथे शंभर कोटी रुपये खर्च करून बांबूपासून इमारत तयार केली आहे. सध्या औद्योगिकीकरणामुळे कार्बनचे उत्सर्जन वातावरणात वाढत आहे. ते थांबवायचे असेल व जगातील जीवजंतू सुरक्षित ठेवायचे असतील, तर पर्यावरणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच संजय आसलकर यांच्या हस्ते पाशा पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. अप्पासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रविराज देशमुख, गणेश चव्हाण, सुरेंद्र बोंदाडे, सुनील देशमुख, युवराज हुंबे आदी उपस्थित होते.