न्यायाधीश साळुंखे, कारंडे यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:14+5:302021-05-31T04:24:14+5:30

: येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे व दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एन. ...

Farewell to Judge Salunkhe, Karande | न्यायाधीश साळुंखे, कारंडे यांना निरोप

न्यायाधीश साळुंखे, कारंडे यांना निरोप

: येथील जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे व दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एन. के. कारंडे यांची बदली झाल्याबद्दल शुक्रवारी विधिज्ञ मंडळाच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. पणुरे होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. ए. कानशिडे, सह दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) एम. टी. बिलाल, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिलीप सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. विधीज्ञ मंडळाच्यावतीने ॲड. सगर, ॲड. पी. एन. तोतला, ॲड. मल्हारी बनसोडे यांनी न्यायाधीश साळूंखे, कारंडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास ॲड. एम. डी. गायकवाड, ॲड. संदीप देशपांडे, ॲड. बनसोडे, ॲड. जी. के. गायकवाड, ॲड. आर. एम. इंगळे, ॲड. सयाजी शिंदे, ॲड. डी. एम. सांगवे, ॲड. यू. व्ही. वैद्य यांच्यासह विधिज्ञ मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. एस. पी. इनामदार यांनी केले.

Web Title: Farewell to Judge Salunkhe, Karande