शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही पापनास तलाव कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

(फोटो : अजित चंदनशिवे १३) अजित चंदनशिवे तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पापनास तलावाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी ...

(फोटो : अजित चंदनशिवे १३)

अजित चंदनशिवे

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पापनास तलावाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अजूनही तलावाची बकाल स्थिती कायमच असून, येथील वाढलेले झाडे-झुडपे काढून बोटिंग करून पर्यटक, भाविकांना विरंगुळ्यासाठी तलाव खुला करावा, अशी मागणी पर्यटक, भाविक व शहरवासीयांमधून केली जात आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील पापनास हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण आहे. येथील तलावाचा विकास व्हावा यासाठी १९५० साली येथील भारत सेवक समाज संस्थेने जनावरांच्या पाण्यासाठी व पिण्यासाठी श्रमदानातून स्वतः तलाव खोदून पूर्ण केला होता. यानंतर प्रशासनाने काही काळ त्याची डागडुजी केली. तुळजापूर हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे येणारे भाविक पिकनिक स्पॉट म्हणून या तलावाकडे येतील, या उद्देशाने व शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या ३२५ कोटी रुपये निधीमधून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पापनास तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यावर जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून गाळ काढून सभोवताली आकर्षक अशी दगडी भिंतही उभारण्यात आली. तसेच आतमध्ये पर्यटकांना आसन व्यवस्था, शौचालयगृह यासह अन्य कामेही करण्यात आली आहेत. असे असले तरी गेली पाच-सहा वर्षापासून तलावाचा दरवाजा नागरिक, भाविक व पर्यटकांसाठी बंदच आहे. सद्यस्थितीत तलावामध्ये बाभळीची झाडे-झुडपे तसेच शेवाळे वनस्पती वाढली आहे. तलाव सुस्थितीत राहावा यासाठी गेल्या काही वर्षात कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे तलावाच्या सुशोभीकरणावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात तर गेलाच, शिवाय त्याची बकाल अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

कोट.....

१९५० मध्ये भारत सेवक समाज संस्थेने श्रमदानातून पापनास तलावाची निर्मिती केली होती. यानंतर प्रशासनाने काही काळ त्याची देखभाल दुरुस्तीही केली. तुळजापूर विकास प्राधिकरणातून या तलावातील गाळ काढणे व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, तलावाची सद्यस्थिती पाहता यावर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसत आहे. केलेले बांधकामदेखील पडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रशासनाने अपूर्ण राहिलेले कामे लवकर पूर्णत्वास नेऊन हा तलाव खुला करावा.

- भाऊ भांजी, माजी नगरसेवक, तुळजापूर

काम पूर्ण झाल्यानंतरही तलाव का वापरात नाही, याबाबत मलाही काही माहिती नाही. मी येथे आल्यापासून तीन वेळा या तलावाची स्वच्छता करून घेतली. लॉकडाऊनच्या अगोदरदेखील स्वछता, डागडुजी करण्यात आली. मार्च २०२० मध्ये जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी संयुक्त भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या सूचनेनुसार तलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नंतर लॉकडाऊन लागल्याने ते सुरू होऊ शकले नाही. आता लॉकडाऊनचे नियम उठेपर्यंत ते सुरू करणे शक्य नाही.

- योगिता कोल्हे, तहसीलदार, तथा मंदिर व्यवस्थापक