छावा संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:35+5:302021-07-07T04:40:35+5:30

भूम : येथील शासकीय विश्रामगृहात छावा संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. यात विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांचा सत्कार करण्यात ...

Election of office bearers in the meeting of Chhawa Association | छावा संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी

छावा संघटनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी

भूम : येथील शासकीय विश्रामगृहात छावा संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. यात विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी संघटनेमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करून आरक्षण मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी सांगितले. बैठकीस प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष बाबाराजे रोटे, मराठवाडा संपर्कप्रमुख अमरभाई शेख, जिल्हाध्यक्ष महेश गवळी, युवक जिल्हाध्यक्ष अनिल माने, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, परमेश्वर खोचरे, ज्ञानेश्वर लाकाळ, औदुंबर जमदाडे, प्रशांत इंगळे, योगेश कवडे, विठ्ठल लटके, संतोष साळुंके, गणेश नलवडे, अमोल आमकर, विठ्ठल बाराते, अर्जुन जाधव, जोतीराम पन्हाळे, ईरफान पठाण, महेश येडे, अजय भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्षपदी दिगंबर ढगे, भूम तालुका उपाध्यक्षपदी शरद खंडागळे, तालुका सचिव सचिन निरफळ, वाशी शहराध्यक्ष राजेश कवडे व तुषार कवडे यांच्या निवडी करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Election of office bearers in the meeting of Chhawa Association