शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:37 IST

इतक्या कमी वयाच्या अर्भकाला वाचविण्यात यश येणारी जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली आहे़.

उस्मानाबाद : जन्मत: वजन ६५० ग्रॅम, श्वास घेतानाही होणारा त्रास, अशा स्थितीतील एका चिमुकलीस जीवदान देण्यात येथील महिला रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे़ अडीच महिन्यानंतर बालिकेला डिस्चार्ज देण्यात आला आहे़ विशेषत: इतक्या कमी वयाच्या अर्भकाला वाचविण्यात यश येणारी जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली आहे़.

उस्मानाबाद येथील ६० खाटाच्या जिल्हा रूग्णालयात प्रसुती होणाऱ्या गरोदर महिलांची संख्या १५० च्या वर असते़ मंजूर पदानुसार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत़ अपुऱ्या खाटांमुळे जमिनीवर गाद्या टाकून महिलांवर उपचार केले जातात़ अशा परिस्थितीत या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जन्म: ६५० ग्रॅम वजन असलेल्या बालिकेला जीवदान मिळाले आहे़ शहरातील उंबरे कोठा भागात राहणारे रवींद्र झोंबाडे यांच्या पत्नी शितल यांची शहरातील खासगी रूग्णालयात ४ जुलै रोजी प्रसुती झाली होती़ त्यांना जुळ्या मुली झाल्या होत्या.

मात्र, वजन कमी असल्याने एका अर्भकाचा जन्म: मृत्यू झाला़ दुसऱ्या मुलीला उपचारासाठी महिला रूग्णालयातील ‘एसएनसीयू’  मध्ये (बालकांचे अतिदक्षता विभाग) ठेवण्यात आले होते़ ६५० ग्रॅम वजनाच्या अर्भकाला वाचविण्याचे मोठे आव्हान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर होते़ त्या बालिकेला अनेकवेळा श्वास घेताना अडचणी येत होत्या़ शिवाय अन्नही पचन होत नव्हते़ बालिकेला वाचविण्यासाठी आणि सुदृढ बनविण्यासाठी महिला रूग्णालयातील अधीक्षक डॉ़ आऱपी़वाघमारे, बालरोग तज्ज्ञ डॉ़ मुकुंद माने  यांनी कांगारू पध्दतीचा अवलंब करून उपचार सुरू केले़ बाळाचे शरीर थंड पडू नये म्हणून आईने तिला शरिराची उब दिली़ महिला रूग्णालयातील टीम व बालिकेच्या माता-पित्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज त्या बालिकेचे वजन १३०० ग्रॅमवर गेले असून, तिला डिश्चार्ज देण्यात आला आहे़

प्रयत्नांना यशयापूर्वी महिला रूग्णालयात ९०० ग्रॅम वजनाच्या अर्भकावर यशस्वी उपचार करण्यात आले होते़ मात्र, झोेंबाडे यांच्या ६५० ग्रॅम वजनाच्या स्त्री अर्भकावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत़ आम्ही एकत्रित केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ़ मुकुंद माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

‘तिच्या’ जिवासाठी मातापित्याची धावपळरवींद्र झोंबाडे हे फळांची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात़ त्यांना यापूर्वीच्या तीन मुली आहेत़ चौथीही मुलगी झाली़ मात्र, तिचे वजन कमी होते़ मात्र, झोंबाडे दाम्पत्यांनी या मुलीचे प्राण वाचावेत, यासाठी मोठी धावपळ केली़ यापुढेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुलीची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलOsmanabadउस्मानाबाद