जिल्ह्यात आजपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:05+5:302021-07-15T04:23:05+5:30
उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये अतिसार नियंत्रण पंधरवड्यास १५ जुलैपासून प्रारंभ हाेत आहे. अर्भक मृत्युदर आणि बाल मृत्युदर कमी करणे ...

जिल्ह्यात आजपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा
उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये अतिसार नियंत्रण पंधरवड्यास १५ जुलैपासून प्रारंभ हाेत आहे. अर्भक मृत्युदर आणि बाल मृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान व मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्सचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने बुधवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठक घेतली.
देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. ११ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. आणि या बालकांचे मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात १५ ते ३० जुलै या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या पंधरवड्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सीईओ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानुसार पंधरा दिवसांत १ हजार आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून शून्य ते पाच वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांच्या घरी भेट देऊन ‘ओआरएस’ची पाकिटे आणि ज्या बालकांना अतिसार असेल अशा बालकांना झिंक गाेळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. बैठकीस महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निपाणीकर, उपअभियंता देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, शिक्षणधिकारी गजानन सूसर, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के. के. मिटकरी, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. परळीकर, आयएमएचे प्रतिनिधी डॉ. सचिन बोडके, आयएपीचे प्रतिनिधी डॉ. सागर रामढवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड, जिल्हा सनियंत्रण मूल्यमापन अधिकारी किशोर तांदळे, जिल्हा आशा समन्वयक सतीश गिरी आदी उपस्थित हाेते.