शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:15 IST

धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला.

धाराशिव : दररोज होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. रविवार व सोमवारच्या रात्रीतून पावसाने कहर केला. जिल्ह्यातील तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेषत: भूम व परंडा तालुक्यातील सर्वच मंडळांत १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावे, शेतवस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या. परिणामी, अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर व बोटीचा वापर करावा लागला.

धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परंडा तालुक्यातील सीना, खासापुरी, चांदणी प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सीना, खैरी, नळी, दुधना, सोनगिरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचे पाणी परंडा तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके अन् मातीही वाहून गेली असून, अद्याप अनेक शिवारात पिके पूर्णत: पाण्याखाली बुडाली आहेत.

२२ मंडळांमध्ये अतिवृष्टीधाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला. येथील दहाही मंडळांमध्ये १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस आहे. शिवाय, उमरगा तालुक्यातही सहापैकी ५ मंडळांत अतिवृष्टी नोंदली आहे.

हेलिकॉप्टरने ६० नागरिकांना काढलेपुरात परंडा तालुक्यातील लाखी बुकी, चौघरी वस्ती, नरसाळे वस्ती, वाघेगव्हाण, देवगावसह इतरही काही वस्त्यांवर नागरिक अडकून पडले होते. नाशिक येथून बोलावलेल्या हेलिकॉप्टरद्वारे सुमारे ६० नागरिकांना बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.

पुराच्या लोंढ्याने घेतला जीवभूम तालुक्यातील चिंचोली येथील देवना नवनाथ वारे (७०) या रविवारी रात्री शेतातील शेडमध्ये झोपल्या होत्या. रात्रीतून लगतच्या ओढ्याला पूर आला. देवनाबाई झोपेतच असताना पुराचा एक लोंढा शेडमध्ये शिरला व त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

बांधलेल्या अवस्थेतील जनावरे दगावलीभूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या अवस्थेतील १६ गाई बुडून जागेवरच मृत्यू पावल्या. या गावात एकूण ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली आहे. परंडा तालुक्यातही शेकडो जनावरे वाहून गेली आहेत.

एनडीआरएफ, आर्मी तैनातपरंडा तालुक्यात पावसाने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. पुढचे काही दिवस आणखी जोरदार पावसाचे असतील, असे हवामान विभागाने अलर्ट दिल्याने परंड्यात एनडीआरएफ, सैन्यदलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र