शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात १७ गायी गोठ्यातच दगावल्या, ८७ जनावरे वाहून गेली; शेतीही खरडून निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST

अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले

- संतोष वीरभूम ( धाराशिव) : तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये २१ सप्टेंबर अतिवृष्टीची नोंद झाली. यात शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली व रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. यामध्ये आंबी मंडळात १०९ मिमी, माणकेश्वर १०३ मिमी, भूम १३२ मिमी, वालवड १०९ मिमी तर ईट मंडळात ७५ मिमी इतकी नोंद झाली असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

दरम्यान शहरात तब्बल १३२ मिमी पाऊस झाला. यामुळे शहरातील सर्वच नाले ओसंडून वाहू लागले. यामध्ये शहरातील संजय साबळे यांच्या कृषी दुकानात नाल्यातील पाणी प्रवाहाने घुसले. त्यामुळे दुकानातील खते व औषधे पाण्यात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

यासह तालुक्याच्या सीमेवरील अंतरगाव येथे बाणगंगा नदीला मोठा पूर आला. व नदी पात्राने  नदी पात्र सोडून गावात शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांची घरे, शेतजमिनी व जनावरे याचे अतोनात नुकसान झाले. तब्बल अंतरगाव येथील ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून यातील पिके वाया गेली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे ५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. १०५ घरांचे नुकसान झाले आहे व १२ जनावरे वाहून गेली आहेत. 

पिंपळगाव येथे विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील १७ गायी जागीच दगावल्या, १५ वासरे  व १० गाई वाहून गेली तर पशुखाद्याचे २२ पोते पाण्यात वाहून गेले व गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हिवर्डा येथे पाझर तलाव फुटल्याने २० ते २५ एकर जमीन पाण्यात गेली आहे.पाथरूड येथे ६ घरांची पडझड होऊन १ जनावर दगावले आहे. अंजनसोंडा येथे ३ घरांची पडझड झाली आहे. देवांग्रा येथे १ जनावर दगावले आहे. सुनगिरी येथे तीन घरांची पडझड होऊन तब्बल २० हेक्टर शेती खरडून गेली आहे. बेलगाव पिंपळगाव येथेही पूरामुळे जनावरे वाहून गेली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात तब्बल ८७ जनावरे वाहून व दगावली असल्याची नोंद झाली असल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान देखील झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तातडीने प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे  पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरी