कळंब : तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ, स्फूर्ती फाउंडेशनचे व सावरकर स्मारक समिती यांच्या वतीने त्यांचा कोरोनायोद्धा म्हणून प्रमाणपत्र व फळांची झाडे भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे, भाजपा तालुका सरचिटणीस संजय जाधवर, कृषी सहायक खाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लामतुरे, डॉ. बनसोडे, सुपरवायझर रावजी घोणसे, आशा गटप्रवर्तक आशा दळवी, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जिल्हाध्यक्ष दिनेश पौळ, पत्रकार संदीप कोकाटे, निलेश दिवाने, छबूराव बाराते, बापू भातलवंडे, संदीप अडसूळ, शिवशंकर भातलवंडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व आशा कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना वॉरियर्सचा हिफळ येथे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST
कळंब : तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ...
कोरोना वॉरियर्सचा हिफळ येथे सन्मान
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}