तळागाळातील नागरिकांपर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:43+5:302021-08-23T04:34:43+5:30

कळंब : काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याकरिता ...

Convey the views of the Congress party to the grassroots | तळागाळातील नागरिकांपर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवा

तळागाळातील नागरिकांपर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवा

कळंब : काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याकरिता पक्षाच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा व काँग्रेस पक्ष पुन्हा क्रमांक एकचा पक्ष बनवावा, असे आवाहन काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. खलील सय्यद यांनी केले.

प्रा. सय्यद यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कळंब तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचा येथील पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार होते. याप्रसंगी प्रा. सय्यद म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला ही जबाबदारी केवळ पक्षनिष्ठा, संघटन या गोष्टींमुळे मिळाली आहे. कळंब तालुक्याला जिल्हास्तरावरून झुकते माप देऊन सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करेन. यावेळी तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शेळके, माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख, काँग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ज्योती सपाटे, युवक विधानसभा अध्यक्ष भैया निरफळ, किसान सेलचे तालुकाध्यक्ष विलास करंजकर यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शंकर करंजकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शहाजान शिकलगार, लतिफ तांबोळी, जिल्हा सरचिटणीस भूषण देशमुख, युवक शहराध्यक्ष ताहेर शेख, भटक्या विमुक्त जमातीचे शहराध्यक्ष राजेश पुरी, मागासवर्गीय शहर कोषाध्यक्ष चंदन भोसले, बबन हौसलमल, नासर शेख, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव, सुलतान शेख, सत्तार सय्यद, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष अजित खलसे, भैया शिनगारे, आदींची उपस्थिती होती. रोहित कसबे यांनी आभार मानले.

Web Title: Convey the views of the Congress party to the grassroots