इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:11+5:302021-07-14T04:38:11+5:30
भूम : येथील तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधी घोषणा ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली
भूम : येथील तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधी घोषणा देत निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशामध्ये महागाईचा आगडोंब उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तू अशा प्रत्येक वस्तूंच्या दरात सातत्याने झालेल्या वाढीने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात कोरोना महामारीमुळे अनेक सामान्य नागरिकांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यात ही दरवाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातील गोलाई चौक येथून सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली बागवान गल्ली, गांधी चौक, परंडा रोड येथून प्रतीक पेट्रोल पंप येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुका काँग्रेस अध्यक्ष रुपेश शेंडगे यांनी केले होते. यात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अॅड. सिराज मोगल, जिल्हा युवक सरचिटणीस गणेश शाळू, युवक काँग्रेस अध्यक्ष अण्णा महानवर, विधानसभा कार्याध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा उपाध्यक्ष मोईज सय्यद, भूम युवक शहराध्यक्ष राजू साठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष समी काझी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बादशाह शेख, भूम शहराध्यक्ष महेमूद पटेल, सुधीर गोरे, प्रभाकर डोंबाळे, सादिक शेख, मयूर उगले, अॅड. अमृता गाढवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
130721\img-20210713-wa0005.jpg
काँग्रेस रॅली