पडळकर यांची आमदारकी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:12+5:302021-07-08T04:22:12+5:30

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आ.गोपीचंद पडळकर हे सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत, ...

Cancel Padalkar's MLA post | पडळकर यांची आमदारकी रद्द करा

पडळकर यांची आमदारकी रद्द करा

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आ.गोपीचंद पडळकर हे सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत, तसेच जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत आहेत. यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून आमदारकी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सभापतींना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच लोक प्रतिनिधित्व देण्याचे सभागृह आहे, परंतु सदस्यांना न शोभणारे वक्तव्य करून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सभागृहाचा व जनतेचा अवमान करत आहेत. याप्रसंगी अमोल सुरवसे, जिल्हा सचिव गाउस तांबोळी, कार्याध्यक्ष उमेश मडके, तालुका सचिव समाधान बाराते, शहराध्यक्ष सनी पवार, उपाध्यक्ष जैनउद्दीन शेख, कार्याध्यक्ष रॉबिन बगाडे, अनिल अडतराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Cancel Padalkar's MLA post