बस कुठे अडकली आधीच कळणार, ॲप लॉंचिंग लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:03+5:302021-08-24T04:37:03+5:30

उस्मानाबाद : खासगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीकडे सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात असतात. ...

Already know where the bus got stuck, on app launch delay! | बस कुठे अडकली आधीच कळणार, ॲप लॉंचिंग लांबणीवर!

बस कुठे अडकली आधीच कळणार, ॲप लॉंचिंग लांबणीवर!

उस्मानाबाद : खासगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीकडे सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात असतात. आता प्रवाशांना बस कुठे आहे, याचे अचूक लोकेशन कळण्यासाठी एसटी महामंडळाने व्हीटीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम अमलात आणली आहे. या सिस्टमद्वारे प्रवाशांना आगारात निघालेली बस कुठे आहे, संबंधित गावाला किती वाजता पोहोचेल, याची माहिती मिळणार आहे. राज्यभरात १५ ऑगस्ट रोजी व्हीटीएस मोबाइल ॲपद्वारे ही सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार होती; मात्र अद्याप या प्रणालीचे काम अपूर्ण असल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे.

बस कुठे, हे आधीच कळणार

ॲपमध्ये गाडीचा क्रमांक टाकून प्रवाशांना गाडीचे लाइव्ह लोकेशन पाहता येणार आहे. एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत. स्थानकावर पाेहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती आधीच कळणार आहे.

किती बसेसना बसविली यंत्रणा?

आगार एकूण बस यंत्रणा बसविलेल्या बस

भूम ७४ ७४

कळंब ८८ ८८

उमरगा ८२ ८२

उस्मानाबाद ९२ ९२

परंडा ४५ ४५

तुळजापूर ९६ ९६

१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

व्हीटीएस प्रणालीद्वारे प्रवाशांना बसच्या लाइव्ह लोकेशनची माहिती देण्यात येणार आहे. बसस्थानकाव्यतिरिक्त प्रवाशांना मोबाइल ॲपद्वारे ही माहिती अवगत होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी हे ॲप लाँच होणार होते. हा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे सेवा लांबणीवर पडली आहे.

कोट...

उस्मानाबाद विभागातील सहाही आगारातील बसेसला ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आलेली आहे. महामंडळास सध्या बसचे ट्रॅकिंग समजते. प्रवाशांना बसचे लोकेशन माहिती होण्यासाठी व्हीटीएस ॲप लाँच होणार आहे. ॲपमुळे प्रवाशांनाही मोबाइलद्वारे बसचे लोकेशन पाहणे सोयीचे होणार आहे.

अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद.

Web Title: Already know where the bus got stuck, on app launch delay!