शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसापासून लसीकरण ठप्पच, कोवॅक्सिनचा साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST

कळंब -कळंब शहर व ग्रामीण भागात मागील तीन दिवसापासून लसीकरण ठप्प झाले असून कधी कोविशिल्ड आहे तर कोवॅक्सिन नाही ...

कळंब -कळंब शहर व ग्रामीण भागात मागील तीन दिवसापासून लसीकरण ठप्प झाले असून कधी कोविशिल्ड आहे तर कोवॅक्सिन नाही अन कोवॅक्सिन आहे तर कोविशिल्ड संपत असल्याने ‘लस नको पण चकरा आवरा’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

कळंब शहर तसेच ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कळंब येथे दिवसागाणिक शंभर सव्वाशेवर रेंगाळणारा लसीकरणाचा आकडा आता अडीचशेच्या घरात पोहचला आहे.कोरोना संसर्ग टाळायचा असेल तर लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचे शासनाचे म्हणणे नागरिकांना पटले आहे. त्यामुळे शहर असो वा ग्रामीण भाग, लसीकरणाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.

लसीकरण करण्यासाठी नागरिकांची मानसिकता झाली असताना आता लसींच्या कमतरतेमुळे या प्रक्रियेत खंड येतो आहे. कळंब येथील लसीकरण मागील तीन दिवसापासून लसीअभावी बंद पडले आहे. ग्रामीण भागातही तीच परिस्थिती आहे. लसीकरनामध्ये असा खंड पडत असल्याने लसीकरण केंद्रावर एकाच दिवशी मोठी गर्दी होऊन ना सोशल डिस्टन्स राहते ना नागरिकांना लस व्यवस्थित मिळते.

शनिवारी कळंब ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे तर ग्रामीण भागातही या लसीच्या ९०० कुप्या मिळणार आहेत. हा साठा एकाच दिवसात संपेल असा अंदाज आरोग्य विभागातील अधिकाऱ्यानी सांगितला. त्यामुळे शनिवारी साठा संपला तर रविवारी व त्यापुढे साठा कधी मिळेल याबाबतही अनिश्चितता आहे. कोवॅक्सिन लसींचा साठा कधी मिळेल याबाबतही आरोग्य विभागाकडे माहिती नाही. त्यामुळे कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्याना मुदतीत दुसरा डोस मिळेल का? ही चिंताही सतावू लागली आहे.

चौकट -

उपजिल्हा रुग्णालयाकडील लसीकरण -

कोवॅक्सिन -

पहिला डोस -2597

दुसरा डोस -334

कोविशिल्ड -

पहिला डोस -2972

दुसरा डोस -1662

चौकट -

कोवॅक्सिनची मागणी नोंदविली

आम्ही प्रशासनाकडे कोवॅक्सिन लसीची मागणी नोंदविली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरु होईल. शनिवारी कोविशिल्ड उपलब्ध होईल. यानंतर लागलीच लसीकरण हाती घेण्यात येईल. तसे नियाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.

चौकट -

९०० लसींचा पुरवठा -

ग्रामीण भागासाठी ९०० कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्राला दीडशे याप्रमाणे ६ ठिकाणी या लसी दिल्या जातील. ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी गर्दी होत असल्याने ज्यादा लसी देण्याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले.

चौकट -

लस पुरवठ्यातही भेदभाव -

कळंब सारख्या शहराला तीन तीन दिवस लस मिळत नाही. कधी कोवॅक्सिन नाही तर कधी कोविशिल्ड नाही अशी परिस्थिती असते. आम्ही अधिकाऱ्यांना बोललो तर वरूनच कोटा दिला जातो आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन बाबतही कळंबला सापत्न वागणूक मिळत आहे. कळंब शहराला दररोज किमान ५०० लसींचा पुरवठा करावा, अशी आमची मागणी असल्याचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले.