शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकाळ खंड दिल्यानंतर पावसाचे झाले पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : पेरण्यांनंतर दीर्घ काळ खंड दिलेल्या पावसाचे सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुनरागमन झाले आहे. पिके सुकत चालली असताना ...

उस्मानाबाद : पेरण्यांनंतर दीर्घ काळ खंड दिलेल्या पावसाचे सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुनरागमन झाले आहे. पिके सुकत चालली असताना दुपारपासून लावलेल्या झडीने आता शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी दुपारी पावसाचे आगमन झाले. काहीवेळ मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्यानंतर बराच काळ रिपरिप सुरू होती. या पावसामुळे आसपासच्या शिवारातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय, शहरातील रस्त्यांवरून, नाल्यांतून पाणी वाहून गेले. उस्मानाबादसोबतच वडगाव सि., सांजा, सारोळा या भागांतही पाऊस झाला. परंडा तालुक्यात केवळ १५ मिनिटे पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या, तर भूम परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारच्या सुमारास झाला. आंबी शिवारात सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली होती. लोहारा शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये अर्धा तास रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळपर्यंत उमरगा तालुक्यातील बलसूर, येणेगूर तसेच उमरगा शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, तर दुसरीकडे याच तालुक्यातील मुरुम परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. तुळजापूर तालुक्याच्या काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत वाशी तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती.

मुरुम परिसरात ओढे, नाले वाहिले...

उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरानजीकच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. मुरूमकडून मधल्या मार्गे अंबरनगर तांड्याकडे कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरून पुढे सलगरा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्याला पूर आल्याने शेतातून तांड्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने साखळी करून शेतकऱ्यांनी जीव मुठीत घेत पूल ओलांडला.