२५९ कारवायांत ५५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:03+5:302021-07-15T04:23:03+5:30
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे भाेवले उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे ...

२५९ कारवायांत ५५ हजारांचा दंड वसूल
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे भाेवले
उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ जानेवारीला चाैघांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी दाेनशे रुपये या प्रमाणे आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी मनाई आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अवैध दारू विक्री, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे पाेलिसांनी अचानक छापा मारून राहत्या घरासमाेरून १२ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तसेच दुसरी कारवाई नळदुर्ग शहरात केली. येथून देशी दारूच्या २१ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी बसवेश्वर लांडगे (रा. काटगाव) व मनाेज पिस्के (रा.नळदुर्ग) यांच्याविरुद्ध नळदुर्ग ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.