शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 22:36 IST

नांदलापूर गावच्या हद्दीत संगणमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले

कराड - नांदलापूर येथे सुमारे ६ महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ५ जणांनी २६ वर्षीय युवकाचा तलवार व कोयत्याने वार करत खून केला. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण बोडरे रा. जखिणवाडी ता. कराड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखीणवाडी येथील युवकांमध्ये मागील ६ महिन्यांपूर्वी गावच्या यात्रेत राडा झाला होता. त्याचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोळक्याने नांदलापूर गावच्या हद्दीत संगणमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्याच्या डोक्यावर, हातावर व मांडीवर हे वर्मी घाव करण्यात आले. या हल्ल्यात तो युवक गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. जखमीला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र त्याच्यावर गंभीर वार झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके संशयीतांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी युवकाचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Karad: Youth Murdered in Nandlapur over Old Enmity; Five Arrested

Web Summary : A 26-year-old man was brutally murdered in Nandlapur, Karad, due to a past dispute. Five individuals attacked him with swords and sickles, inflicting fatal injuries. Police are investigating the incident and searching for the suspects. The victim died during treatment at the hospital.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी