तरुणाने पँटची चेन उघडून जबरदस्ती करताच महिलेची 'सटकली', अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:06 PM2020-01-27T12:06:23+5:302020-01-27T12:09:08+5:30

एक इंजिनिअर महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

young man opened his pants chain and tried to molest women | तरुणाने पँटची चेन उघडून जबरदस्ती करताच महिलेची 'सटकली', अन्...

तरुणाने पँटची चेन उघडून जबरदस्ती करताच महिलेची 'सटकली', अन्...

Next

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये डोड्डानेकुंडी तलावाजवळ शनिवारी सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एक इंजिनिअर महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने पँटची चेन खोलून प्रायव्हेट पार्टला हात लावण्यास सांगितले. मात्र, या महिलेने त्याला चांगलाच इंगा दाखवत थेट कॉलर पकडण्याचे धाडस केले. 


एका खासगी कंपनीत काम करणारी अभियंता महिला श्वेता (41, नाव बदललेले)ने सांगितले की, ती या डोड्डानेकुंडी तलावाजवळ सकाळी फिरण्यासाठी गेली होती. जेव्हा ती वॉकिंग ट्रॅकवर पोहोचली तेव्हा तिथे एक व्यक्ती त्याच्या पाळलेल्या कुत्र्यासह बसला होता. जसे श्वेता त्याच्या बाजुने पुढे जाऊ लागली तसे त्या व्यक्तीने कुत्र्याला सोडले. यामुळे तो कुत्रा श्वेताच्या दिशेने शांततेने जाऊ लागला. यामुळे श्वेताने त्या कुत्र्याला चुचकारायला सुरुवात केली. 


याचवेळी हा व्यक्ती श्वेताजवळ आला आणि समोर उभा राहून त्याच्या पँटची चेन खोलली. या व्यक्तीने श्वेताचा हात पकडला आणि जबरदस्तीने त्याचा प्रायव्हेट पार्ट पकडण्यास सांगितले. यानंतर श्वेताने आरडाओरड घालण्यास सुरूवात केली. हे पाहताच त्या व्यक्तीने चेन बंद करून तेथून जाऊ लागला. मात्र, श्वेताने धक्क्यातून सावरत धाडस दाखवून आरोपीची कॉलर पकडली आणि मोबाईलमध्ये फोटोही काढला. या काळात तेथे कोणी येण्याआधीच तो तिथून पळून गेला. या प्रकाराची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. 

वर्कशॉपमधील कामगाराकडून महिलेचा विनयभंग

डीआयजीच्या पत्नीने केला आरोप; माझ्या पतीला अडकविण्याचा मुलीच्या वडिलांचा कट

सिटीस स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लील चाळे

बेंगळुरू मिररला मिळालेल्या माहितीनुसार श्वेताने सांगितले की, हा प्रसंग माझ्यासाठी हैराण करणारा होता. कसे कसे लोक असतात, जे महिलांसोबत अशाप्रकारची कृत्ये करतात. त्याच्या कुत्र्याला चुचकारतानाच तो समोर आला. हे सगळे एवढ्या वेगात घडले की मला काही समजू शकले नाही. 
या प्रकरणी श्वेताने एचएएल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा फोटोही पोलिसांना दिला आहे.

Web Title: young man opened his pants chain and tried to molest women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.