शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

महिलेचा मृतदेह गोणीमध्ये आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:03 AM

या महिलेच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. तिची ओळख पटेल असे काहीच सापडले नाही. 

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मौजे चिंचोटी येथील रस्त्याच्या बाजूला शनिवारी रात्री ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीची हत्या करून गोणीमध्ये भरून फेकलेला मृतदेह सापडला आहे. वालीव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेची ओळख पटवून हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे चिंचोटी येथील सातिवली खिंडीच्या उतरंडीवर रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. अनोळखी महिलेची आरोपीने कोणत्या तरी कारणावरून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा इराद्याने तिचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी गोणीमध्ये भरून फेकून दिला आहे. या महिलेच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. तिची ओळख पटेल असे काहीच सापडले नाही. 

महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून या वयोगटातील महिला कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग आहे का, याची माहिती मिळवत आहोत. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. - विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे 

टॅग्स :Policeपोलिस