A woman in Morroca murdered her boyfriend and feed his body parts to dogs | बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं....

बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं....

संयुक्त अरब अमीरातमध्ये एका महिलेवर आरोप आहे की, तिने तिच्या बॉयफ्रेन्डची हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून ते काही लोकांना आणि कुत्र्यांना खाऊ घातले. असं करण्यामागचं कारण म्हणजे या महिलेला माहीत पडलं होतं की, तिचा बॉयफ्रेन्ड दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्याचा प्लॅन करत आहे.

रिपोर्टनुसार, हे कपल गेल्या सात वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि दोघेही मोरोक्कोमध्ये राहत होते. एका दिवस या व्यक्तीने महिलेच्या घरी जाऊन तिला सांगितले की, तो दुसऱ्या महिलेसोबत लग्न करणार आहे. हे ऐकल्यावर महिला संतापली आणि तिने त्याचा मर्डर केला. (हे पण वाचा : प्रेमाच्या जाळ्यात ओढून ठेवले शारीरिक संबंध अन् अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती)

या महिलेचं वय ३० वर्षे आणि दोघांच्या वयात १० वर्षांचा फरक होता. महिलेने अरबमधील  पारंपारिक आणि लोकप्रिय डिश  मॅचबूशमध्ये या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे टाकून ते शिजवले. यूएईसोबतच ही डिश बहरीनमध्येही लोकप्रिय आहे. ही डिश बिर्याणीसारखी असते.

कोर्टाच्या एका रिपोर्टनुसार, या महिलेने डिश काही पाकिस्तानी वर्कर्सना खाण्यासाठी दिली होती. त्यानंतर महिलेने आपल्या बॉयफ्रेन्डच्या शरीराचे काही तुकडे कुत्र्यांना टाकले. काही वेळाने या व्यक्तीचा भाऊ त्याला शोधत महिलेच्या घरी पोहोचला. त्याला मिक्सर ब्लेंडरमध्ये भावाचा एक दात सापडला. त्याला महिलेवर संशय आला आणि त्याने तिची चौकशी सुरू केली. (हे पण वाचा : आधी बालपणीच्या मित्राच्या पत्नीला पळवलं नंतर मुलीवरही टाकली वाईट नजर....)

या व्यक्तीने नंतर पोलिसात तक्रार दिली आणि अटक झाल्यावर महिलेने आपला गुन्हा कबूल केला.  या महिलेला मेंटल हॉस्पिटलमद्येही नेण्यात आलं आहे.  जेणेकरून तिच्या मानसिक आरोग्याची माहिती मिळावी. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Web Title: A woman in Morroca murdered her boyfriend and feed his body parts to dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.