"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:32 IST2025-07-29T12:31:32+5:302025-07-29T12:32:00+5:30

मृत युवक त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मात्र पत्नी प्रियकरासोबत राहत होती. एकेदिवशी पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकी दिली.

Wife's Lover threatens him, husband dies under mysterious circumstances in Banda UP | "जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन

"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन

बांदा - उत्तर प्रदेशच्या बांदा येथे हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर पोलिसांनी युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला आणि मृत युवकाच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी युवकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

पत्नीच्या प्रियकराने महिलेला सोबत ठेवले होते आणि दुसरीकडे तिच्या पतीला धमकी देत होता. जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतले, कुणाला तक्रार करायची आहे कर, जे उखडायचे आहे ते उखड अशा शब्दात त्याने युवकाला धमकी दिली होती. कोतवाली परिसरातील ही घटना आहे. ज्याठिकाणी युवकाने पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. युवकाच्या पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्याने महिलेला सोबत ठेवले होते. पतीने त्याच्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु पत्नी त्याचे काहीही ऐकत नव्हती. त्याउलट प्रियकरासोबत मिळून तिने पतीला मारहाण केल्याचेही उघड झाले आहे.

मृत युवक त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मात्र पत्नी प्रियकरासोबत राहत होती. एकेदिवशी पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकी दिली. तुला करायचे ते कर, मी तुझ्या बायकोला ठेवून घेतलंय असं त्याने म्हटले. प्रियकराने दिलेली धमकी पतीला सहन झाली नाही. त्यातून त्याला नैराश्य आले आणि आत्महत्या करून पतीने जीवन संपवलं. या घटनेनंतर मृत युवकाच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पत्नी गुडिया आणि तिचा प्रियकर गोपालदास याला अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. वडिलांनी आई आणि तिच्या प्रियकराच्या अनैतिक प्रेमसंबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याचे मुलीने तक्रारीत सांगितले आहे. 

Web Title: Wife's Lover threatens him, husband dies under mysterious circumstances in Banda UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.