'पत्नीचं गार्डसोबत अफेअर, मला मारहाण करते, पोलिसांनीही मलाच मारलं'; पतीची पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:36 IST2022-06-21T13:36:05+5:302022-06-21T13:36:36+5:30
UP Crime News : व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पत्नीचं एका होमगार्डसोबत अफेअर सुरू आहे. या नात्याला विरोध केल्यास ती त्याला मारहाण करते. तर होमगार्ड त्याला धमकी देतो. या व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं.

'पत्नीचं गार्डसोबत अफेअर, मला मारहाण करते, पोलिसांनीही मलाच मारलं'; पतीची पोलिसांकडे तक्रार
UP Crime News : उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने पोलिसांकडे त्याच्या पत्नीची तक्रार केली आहे. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, सर, माझी पत्नी मला मारहाण करते. तिला बोलवून समजवा. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पत्नीचं एका होमगार्डसोबत अफेअर सुरू आहे. या नात्याला विरोध केल्यास ती त्याला मारहाण करते. तर होमगार्ड त्याला धमकी देतो. या व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं.
हा व्हिडीओ Law Prem Prakash नावाच्या यूट्यूब चॅनलवर अलपोड करण्यात आला आहे. व्हिडीओत जनसुनावणी दरम्यान या व्यक्तीने सांगितलं की, त्याची पत्नी त्याला मारहाण करते. एकदा तर तो झोपला असताना तिने त्याच्यावर दगडाने हल्ला केला होता. याबाबत त्याने पोलिसात तक्रारही दिली होती. पण काही कारवाई झाली नाही. व्हिडीओनुसार, ही घटना प्रयागराजची आहे.
या व्यक्तीने पुढे सांगितलं की, सर, मला 10 वर्षांची मुलगी आहे. 8 आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. माझी पत्नी मला मारहाण करते. माझ्या आईलाही शिव्या देते. पोलीस आले होते. त्यांनी तिला समजावलं होतं. पण तिने काही ऐकलं नाही. ती नेहमीच भांडण करते. धमक्या देते. पोलिसांकडे आलो तर मला मारहाण करते. मुलांना घेऊन ती गेली. एकदा झोपेत असताना तिने मला विटेने मारलं होतं. माझ्या वडिलांनाही मारहाण करत होती. ती म्हणते की, मी कुठेही जाईन त्याच्याशी तुला काय? मला जे वाटेल ते मी करेन. तू कोण मला रोखणारा?
पीडित व्यक्तीने सांगितलं की, पोलिसांनी पत्नीवर कारवाई करण्याऐवजी मलाच मारहाण केली आणि एका रात्रीसाठी तुरूंगात बंद केलं. या व्यक्तीचं ऐकून घेतल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्डची ड्युटी दुसऱ्या भागात लावण्याचा आदेश दिला आहे. सोबतच योग्य ती कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.