शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन का दिला?; सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 11:30 IST

Arnab Goswami News : महाराष्ट्रात अर्णब गोस्वामींना अटक होताच राजकीय वातावरण तापले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीकाही करण्यात आली होती.

नवी दिल्ली : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली होती. तसेच त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यावर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत खालच्या न्यायालयात जाण्यासाठी सांगितले होते. याविरोधात गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने गोस्वामींना अंतरिम जामीन दिला होता. याचे कारण आज न्यायालयाने दिले आहे. 

महाराष्ट्रात अर्णब गोस्वामींना अटक होताच राजकीय वातावरण तापले होते. ११ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालायाने गोस्वामींना जामीन दिला होता, तसेच उच्च न्यायालयालाही फटकारले होते.  वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारले जाण्याच्या प्रकरणांत उच्च न्यायालयांची कामगिरी समाधानकारक नाही, असे ताशेरेही सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी व अन्य आरोपींच्या जामीन याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी अर्णब गोस्वामी, नितीश सारडा, परवीन राजेश सिंह या तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.

 सुनावणीप्रसंगी न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळीच हस्तक्षेप केला नसता तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या दिशेनेच एकूण वाटचाल सुरू राहिली असती. एखाद्याची वृत्तवाहिनी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती पाहू नका. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करत असेल तर त्या सरकारला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे हे लक्षात घ्या अशीही तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.

आज अंतरिम जामिन का दिला, याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामींवर दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रथम दर्शनी मूल्यमापनात गोस्वामींविरोधात गुन्हा केल्याचे दिसत नाही. यामुळे अंतरिम जामिन दिल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे. 

अर्णब यांची सुटका आणि घोषणाबाजीरात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर पडले. या वेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती. ‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाली अर्णब’ - ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाइल टॉर्च लावून सर्वांनी केले. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय