शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 12:28 IST

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र बापाने दोन निष्पाप मुलांना खूप त्रास दिला.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र बापाने दोन निष्पाप मुलांना खूप त्रास दिला. मुलांना काठीने मारहाणच केली नाही तर तीन दिवस टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं. मुलांनी त्यांच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार पोलिसांसमोर सांगितला आहे. संभल जिल्ह्यातील हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सात आणि पाच वर्षांच्या दोन मुलांचा छळ केल्याच्या आरोपावरून सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संभल जिल्ह्यातील हयात नगर पोलीस स्टेशन हद्दीतील दौलतपुरी गावाशी संबंधित ही घटना आहे. गावातील रहिवासी महेश याने ३ वर्षांपूर्वी मुरादाबाद येथील दोन मुलांची आई रेखा हिच्याशी लग्न केलं होतं. रेखाचं २ महिन्यांपूर्वी निधन झालं. यानंतर सौरभ आणि शौर्य या दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महेशवर आली. काही दिवस सगळे सुरळीत होतं. मात्र, त्यानंतर सावत्र बापाने दोन्ही निष्पाप मुलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींमुळे दोन्ही मुलांना घरात राहणं कठीण झालं.

तीन दिवसांपूर्वी सावत्र बाप महेश याने दोन्ही मुलांना काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना टॉयलेटमध्ये कोंडून ठेवण्यात आलं. एवढेच नाही तर त्यांना काही खायला, प्यायलाही दिलं नाही. मुलं रडत रडत त्यांना टॉयलेटच्या बाहेर काढण्याची विनंती करत होते. पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही. यानंतर शेजारच्या लोकांना हा प्रकार कळताच त्यांनी दोन्ही मुलांना टॉयलेटमधून बाहेर काढलं. 

संपूर्ण घटनेची माहिती मुलांच्या आईच्या नातेवाईकांना दिली. माहिती मिळताच मुलांचा मामा तेथे आला आणि दोन्ही मुलांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी महेशविरुद्ध माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितलं की, गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस