माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 22:17 IST2021-09-27T22:16:58+5:302021-09-27T22:17:21+5:30
Accident Case : हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला.

माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाजवळ गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारुशीला राहूल पाटील (वय ४०) व निशांत राहूल पाटील (वय १२ रा.एरंडोल) हे मायलेक ठार तर चारुशीला यांची बहीण रुपाली पाटील (वय ४५) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला.
दरम्यान, एक ते दीड तासानंतर मयताची ओळख पटली.या अपघातामुळे महामहामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.