Two-wheeler rider killed in truck collision in Nagpur | नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर: मुलीला शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्याने त्यांचा करुण अंत झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोनी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
हेमराज कवडूजी वरठी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते सुकळी टाकळी येथे राहत होते. त्यांची मुलगी हिंगण्यात शिकते. तिला घेण्यासाठी ते सुकळी टाकळीवरून गुरुवारी दुपारी ३. ३० च्या सुमारास मोटरसायकलने मिहान ते हिंगणा मार्गाने येत होते. रायसोनी कॉलेजसमोर आरोपी ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून हेमराज वरठी यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे वरठी यांचा करुण अंत झाला. दुर्गादास कवडूजी वरठी यांच्या तक्रारीवरून एएसआय प्रमोद पाटील यांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी फरार
अपघातानंतर घटनास्थळी निर्माण झालेला तणाव बघता आरोपी ट्रकचालक तेथून पळून गेला. वेळीच पोलीस पोहचल्याने संभाव्य अनर्थ टळला. या अपघातामुळे वरठी यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Two-wheeler rider killed in truck collision in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.