कामावरून कमी केल्याने कंपनीचे फेसबुक बंद करण्याचा प्रयत्न; मुंबईतील महिलेवर गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:48 IST2019-02-07T21:46:20+5:302019-02-07T21:48:31+5:30
कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

कामावरून कमी केल्याने कंपनीचे फेसबुक बंद करण्याचा प्रयत्न; मुंबईतील महिलेवर गुन्हा नोंद
मडगाव - कामावरुन कमी केल्यानंतर त्याचा वचपा म्हणून कंपनीच्या फेसबुक पेजवर छेडछाड करुन पेज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मूळ मुंबईतल्या एका महिलेवर गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अमरिता गुजराल सचदेव असे संशयिताचे नाव असून, ती मुंबईतील गोरेगाव येथील रहिवाशी आहे.
कोलवा येथील कारावेला बीच रिर्सोट अदवानी हॉटेल्स अॅण्ड रिर्सोटस ( इंडिया लिमिटेड) चे सुरक्षा व्यवस्थापक लुईस डिकॉस्ता हे तक्रारदार आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २000 कलम ७२ अंतर्गंत कोलवा पोलिांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
मागच्या वर्षी १५ आॅगस्ट २०१८ ते ६ सप्टेंबर २०१८ दरम्यान ही घटना घडली आहे. सचदेव या कारावेला बीच रिर्सोटमध्ये सेल्स अँण्ड मार्केटींगच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. ११ आॅगस्ट २0१८ कामावरुन त्यांना कमी करण्यात आले. संचालक तसेच सिस्टम अॅडमिनीस्टेटरला कुठलीही कल्पना न देता संशयिताने कारवेला बीच रिर्सोट गोवाच्या फेसबुक पेजची सेक्युरेटी आॅप्शन चालू करण्याचा प्रयत्न करुन ही पेज बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य न झाल्याने संशयिताने ती फेसबुक पेज बदलून टाकण्याचाही प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद केले आहे. संशयिताने हे कृत्य करुन गोपनियतेचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.