अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तलाक दिलेल्या महिलेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 21:28 IST2021-08-29T21:27:23+5:302021-08-29T21:28:55+5:30
Suicide Case : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाराज झालेल्या महिलेने आत्महत्या केली.

अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तलाक दिलेल्या महिलेने केली आत्महत्या
मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका व्यक्तीने आपल्या २५ वर्षांच्या पत्नीशी तिहेरी तलाक सांगून ब्रेकअप केले. पत्नीला ट्रिपल तलाक दिल्यानंतर तीन महिन्यांनी तिचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाराज झालेल्या महिलेने आत्महत्या केली.
ही घटना भोपा पोलीस स्टेशन अंतर्गत किशनपूर गावात घडली. स्टेशन प्रभारी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले की, आरोपी आणि महिलेचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना १८ महिन्यांचा मुलगा आहे.
पत्नी माहेरी राहत होती
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तीन महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाक सांगून पत्नीशी संबंध तोडले होते. पतीने ट्रिपल तलाक दिल्यानंतर महिला आपल्या मुलासह किशनपूर गावात तिच्या पालकांसोबत राहायला गेली.
१८ महिन्यांच्या मुलाला सोबत घेतले
या प्रकरणात १८ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने तिच्या पतीवर ट्रिपल तलाक दिल्याचा आणि तिच्याकडून मुलाला जबरदस्तीने काढून घेण्याचा आरोप केला. पतीने सोशल मीडियावर पत्नीचा अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चतुर्वेदी म्हणाले की, आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते, दरम्यान महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.