थरारक! दिल्लीतील गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड करत महिला, लहान मुलांनी केली बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:56 PM2020-08-17T20:56:41+5:302020-08-17T21:01:13+5:30

जवळ असलेल्या घरांमध्ये घुसून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Thrilling! Delhi goons, women vandalizing vehicles, children beaten to death | थरारक! दिल्लीतील गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड करत महिला, लहान मुलांनी केली बेदम मारहाण 

थरारक! दिल्लीतील गुंडांचा हैदोस, गाड्यांची तोडफोड करत महिला, लहान मुलांनी केली बेदम मारहाण 

Next
ठळक मुद्देगुंडांच्या टोळक्याच्या या हैदोसामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गुंडांनी हैदोस घातला आहे. रात्री उशिरा परिसरात गोळीबार करत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर दिल्लीतील काश्मिरी गेटच्या मोरी गेट कुचा मोहतर खान येथे रात्री उशिरा जवळपास १० ते १२ गुंडांच्या टोळक्याने गोळीबार केला आणि रस्त्यावरील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जवळ असलेल्या घरांमध्ये घुसून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुंडांच्या टोळक्याच्या या हैदोसामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिकांनी दिल्ली पोलिसात यासंदर्भात अज्ञात गुंडांविरोधात तक्रार दाखल केली आहे. उत्तर दिल्लीत मध्य रात्रीच्या सुमारास गुंडांनी रस्त्यात मिळेल त्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची काठ्या आणि रॉडच्या सहाय्यानं तोडफोड करून नुकसान केले आहे. त्यानंतर हवेत गोळीबार केला. या प्रकऱणी अद्याप कोणतेच सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलेले नाही. या गुंडांनी जवळच्या घरांमध्ये घुसखोरी करून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण देखील केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

Web Title: Thrilling! Delhi goons, women vandalizing vehicles, children beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.