बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 05:43 PM2020-08-17T17:43:18+5:302020-08-17T17:44:53+5:30

क्राईम ब्रंँचची धडक कारवाई, तीन परदेशी महिलांची कसून चौकशी

23 arrested including Bollywood actor, rave party in Goa under corona virus terror | बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

Next
ठळक मुद्देगोवा क्राईम ब्रँचने वागातोर येथील एका फिरंगी विलास नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री  सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केला आणि 23 जणांना अटक केली.

पणजी - देश कोरोनाच्या विळख्यात असतानाच रेवा पार्ट्या करण्याचे आणि अंमली पदार्थ सेवन धिंगाणा घालण्याचे प्रकार गोव्यात उघडकीस आले आहेत. गोवा क्राईम ब्रँचने वागातोर येथील एका फिरंगी विलास नामक बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री  सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केला आणि 23 जणांना अटक केली.


वागातोर येथे रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे क्राईम ब्रँचने या ठिकाणी गुप्तपणे पाळत ठेवली होती..15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पोलिसांनी अचानाक येवून छापा टाकल्यामुळे सर्व पार्टीवाले अचंबित झाले. काहींनी पळही काढला तर 23 जणांना पकडण्यास पोलिसांना यश आले. 

 

अटक करण्यात आलेल्यात बहुतेक सर्व गोव्याबाहेरील आहेत. तसेच गोव्यातीलही आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन विदेशी महिलांचाही त्यात समावेश आहे. त्या ठिकाणी 9 लाख रुपयांचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती या विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली. त्यात एक्स्टेसी हा घातक अंमली पदार्थ, एमडीएमएच्या गोळ्या आणि चरस होता. हे सर्व पदार्थ सेवन करण्यासाठी आणले होते अशी माहितीही पोलिसांकडून मिळाली आहे. 

 

क्राईम ब्रँचचे निरीक्षक राहूल परब, नारायण चिमुलकर, महिला उपनिरीक्षक रिमा नाईक आणि संध्या गुप्ता यांचा पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सर्व संशयितांवर सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा तसेच अंमली पदार्थांच्या वापराचा गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता कपिल झावेरी हा मुख्यमंत्री प्रमोद सासवंत यांना पुष्पगुच्छ देवून भेटत असल्याचे जुने छायाचत्रही व्हायरल झाले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीसाांना मोकऴा हात देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. कुणी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला भेटला तर त्याने गुन्हा केला तर शिक्षाही भोगाविच लागेल असेही मुख्यमंत्री मिहणाले

रेव्ह पार्टीचे बॉलिवूड कनेक्शन 

रेव्ह पार्टीचे बॉलिवूड केक्शनही उघडकीस आले असून ही पार्टी ज्या फिरंगी विलामध्ये झाली होती ते घर बॉलिवूड अभिनेता कपील झवेरी यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. क्राईम ब्रँचचे अधिक्षक शोभित सक्सेना यांनी या वृत्ताला पुष्टीही दिली आहे. केवळ घरच  कपील मिश्रा यांचे नसून तो स्वतः पार्टीत  इतर सहकाऱ्यांसह उपस्थित होता. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. त्याच्यासह इतर सर्व संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडीही ठोठावण्यात आली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश

Read in English

Web Title: 23 arrested including Bollywood actor, rave party in Goa under corona virus terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.