शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:51 IST

महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून तिच्या पतीला मारून टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देपैशांचीही केली मागणी : सरकारी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असलेल्या महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून तिच्या पतीला मारून टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे पाच लाखांची मागणी केली. पिंपरी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारी कर्मचाºयावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा शाहू चौहान (वय ३५, रा. कोंढवा) असे सरकारी कर्मचारी असलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी कर्मचारी असलेल्या ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरीतील नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होत्या. त्यावेळी इकडे ये, असे आरोपी चौहान म्हणाला. त्यालाफिर्यादीने नकार दिला. त्यामुळे आरोपी चौहान याने शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. तू माझी नाही झाली तर, तुला कोणाचीच होऊ देणार नाही, तू मला फक्त कधी एकटी भेट, तुज्या तोंडावर अ?ॅसिड फेकल्याशिवाय शांत बसणार नाही. तुज्या नवºयालासुद्धा मारून टाकेन. आपल्या दोघांचे फोटो माज्याकडे आहेत. ते मी सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करेन, तुझे जगणे अवघड करेन, अशी धमकी आरोपी चौहान याने दिली. तुला फोटो पाहिजे असतील तर, मला पाच लाख रुपये दे, असे म्हणून पतीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची आरोपी चौहान याने धमकी दिली. तसेच सोशल मीडियावर आरोपीने डीपीला फियार्दीचा फोटो ठेवला असल्याने फियार्दीच्या मनास लज्जा उत्पन्न करून फियार्दी महिलेचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला