तेराशे जिलेटिनच्या कांड्या जप्त; एटीएसने घोटा येथे कारवाई करत एकाला केली अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:57 PM2021-05-17T19:57:31+5:302021-05-17T19:58:22+5:30

Gelatin sticks seized : अवैधरीत्या स्फोटके बाळगणाऱ्या आरोपींना देखील जेरबंद करण्यात आले आहे.

Thirteen hundred gelatin sticks seized; ATS arrests one in Ghota | तेराशे जिलेटिनच्या कांड्या जप्त; एटीएसने घोटा येथे कारवाई करत एकाला केली अटक  

तेराशे जिलेटिनच्या कांड्या जप्त; एटीएसने घोटा येथे कारवाई करत एकाला केली अटक  

googlenewsNext
ठळक मुद्देघोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकून १३०० जिलेटिनच्या कांड्या, ८३५ डिटोनेटर्स अशी स्फोटके जप्त केली आहेत.

अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकून १३०० जिलेटिनच्या कांड्या, ८३५ डिटोनेटर्स अशी स्फोटके जप्त केली आहेत. अवैधरीत्या स्फोटके बाळगणाऱ्या आरोपींना देखील जेरबंद करण्यात आले आहे.
           

मुंबईत स्फोटके आढळून आल्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैधरीत्या स्फोटके बाळगणाºया व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सुनील केवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, श्यामकु मार गावंडे, चंद्रशेखर खंडारे, मंगेश लकडे यांच्या पथकाने माहितीच्या आधारे तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर सोमवारी छापा घातला.

     

यावेळी युवराज उद्धव नाखले (४२, रा. घोटा) याला ताब्यात घेण्यात आले. गोदामातून १३०० नग जिलेटिनच्या कांड्या, ८३५ डिटोनेटर्स आणि ब्लास्टिंग यंत्र बसवलेला ट्रॅक्टर असे एकू ण ४ लाख ३५ हजार ६२० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही स्फोटके या गोदामात अवैधरीत्या साठवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. या स्फोटकांचा कु ठल्याही प्रकारचा परवाना संबंधित व्यक्तीकडे नव्हता. आरोपीची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने ही स्फोटके ईश्वर मोहोड (रा. मार्डी) याने पुरविल्याची माहिती दिली. आरोपीला कु ºहा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध सुरू के ला आहे.

Web Title: Thirteen hundred gelatin sticks seized; ATS arrests one in Ghota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.