शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज म्हणून काढलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी केली लंपास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 20:26 IST

House Breaking : अमन पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी

ठळक मुद्देभरदिवसा व तीही वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाल्याने खान दाम्पत्याला धक्का बसला.

जळगाव : पत्नीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मागे चोरट्यांनी घरफोडी करुन कर्जाने काढलेले एक लाख रुपये व दीड लाखाचे दागिने असा अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी १ या दरम्यान उस्मानिया पार्कमधील अमन पार्कमध्ये घडली. याप्रकरणी घरमालक फकिरा खान उस्मान खान (वय ४०) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फकिरा खान हे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी शमीनाबी ही गर्भवती असल्याने शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घराला कुलुप लावून ते पत्नीला दवाखान्यात घेऊन गेले. तेथून परत १ वाजता घरी आले असता कुलुप कापलेले व खाली पडलेले होते. घरातील बेडरुमधील कपाट उघडे होते तर त्यात फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज म्हणून काढलेले एक लाख रुपयांची रोकड गायब झाली होती. त्याशिवाय पत्नीचे दागिनेही गायब झालेले होते. भरदिवसा व तीही वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाल्याने खान दाम्पत्याला धक्का बसला.

दरम्यान, याप्रकारानंतर खान यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून घरफोडीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घराची पाहणी केली तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाकडून परिसरात टेहाळणी करण्यात आली. पोलिसांनी काही संशयितांची चौकशी केली तर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तपासणी केली.

असा गेला मुद्देमाल१ लाख रुपये रोख३१ हजार २८७ रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंग२२ हजार ५६५ रुपये किमतीचे सोन्याचे मनी व पोत६० हजार रुपये किमतीची सोन्याची पांचाली पोत९ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी१५ हजार ५७० रुपये किमतीचे चांदीचे पैंजन१ हजार २६० रुपये किमतीची सोन्याची नाकातील फुली४ हजार ७२८ रुपये किमतीचे सोन्याचे स्टाप

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगावPoliceपोलिस