शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:45 IST

जुन्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून हा वाद इतका विकोपाला जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती. पण...

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्युडी खुर्दकला गावात एका काकीने आपल्याच पुतण्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. जुन्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून हा वाद इतका विकोपाला जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती.

काय आहे प्रकरण?गावात राहणाऱ्या उमाकांत याचा त्याचे काका चरन पाल आणि काकी अनिता देवी यांच्यासोबत वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. शनिवारी सकाळी अनिता देवीचा उमाकांतच्या कुटुंबासोबत पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी उमाकांत घरी नव्हता; तो रोजच्याप्रमाणे जरी कारखान्यात मजुरी करण्यासाठी गेला होता.

काकीने केला जीवघेणा हल्लासायंकाळी उमाकांत काम संपवून घरी परत येत असताना, त्याची काकी अनिता देवी आपल्या घराच्या दारात उभी होती. उमाकांत तिच्या दारासमोरून जात असताना, अनिता देवीने अचानक त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. उमाकांतला सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदातच तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. उमाकांतच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक आणि त्याचे कुटुंबीय धावत आले. रक्ताने माखलेल्या उमाकांतला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. हे ऐकून कुटुंबात हाहाकार माजला. आई-वडील आणि भावंडं हंबरडा फोडून रडू लागले.

पोलिसांकडून तपास आणि कारवाईघटनेची माहिती मिळताच भुता पोलीस ठाण्याचे पोलीस, सीओ फरीदपूर संदीप सिंह आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथक गावात पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ सील केले. फॉरेन्सिक तज्ञांनी रक्ताचे नमुने, चाकूचे निशाण आणि आजूबाजूच्या परिस्थितीची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

उमाकांतच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अनिता देवीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अनिता देवीला ताब्यात घेतले. चौकशीत अनिता देवीने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, जमिनीच्या वाटणीवरून तिचा उमाकांत आणि त्याच्या कुटुंबाशी दीर्घकाळापासून वाद सुरू होता. अनेकवेळा पंचायतही बसली, पण प्रकरण मिटले नाही. अखेर रागाच्या भरात तिने पुतण्याची हत्या केली.

सीओ फरीदपूर संदीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश