धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:33 PM2021-05-20T18:33:35+5:302021-05-20T18:36:17+5:30

वडघर येथील श्री कालिका माता मंदिरात रिक्षाने आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील साहित्याची चोरी केली आहे.

Theft in two temples of Vadghar in Bhiwandi | धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी

धक्कादायक! भिवंडीतील वडघरच्या दोन मंदिरांमध्ये चोरी

Next

भिवंडी - भिवंडीतील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात असलेल्या मंदिरांमध्ये वळविला असून तालुक्यातील वडघर येथील श्री कालिका माता मंदिर व शंकर मंदिर या दोन मंदिरांमध्ये चोरी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजता घडली आहे. दरम्यान चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी गावकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

वडघर येथील श्री कालिका माता मंदिरात रिक्षाने आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील साहित्याची चोरी केली आहे. त्याचबरोबर याच मंदिराच्या पाठीमागे थोड्या अंतरावर असलेल्या शंकर मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली असून या दोन्ही मंदिरातील तांब्याच्या महागड्या समयी, घंटा व इतर साहित्य दोन चोरट्यांनी चोरी करून नेले आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस यंत्रणेने या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. 
 

Web Title: Theft in two temples of Vadghar in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.