WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली

South Africa vs Nepal T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेने नेपाळविरूद्ध निसटता विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 08:28 AM2024-06-15T08:28:12+5:302024-06-15T08:28:28+5:30

whatsapp join usJoin us
WHAT A MATCH! Africa was beaten by the Asian team; 1 run short of a huge reversal | WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली

WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SA vs NEP Live Match Updates : यंदाच्या विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला. पण, त्यांना आशियाई संघाने चांगली टक्कर देऊन घाम फोडला. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील ३१ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर आफ्रिकेने बाजी मारली. शेवटच्या चेंडूवर नेपाळला विजयासाठी २ धावांची गरज असताना आफ्रिकेने एक बळी घेऊन सामना एक धावेने आपल्या नावावर केला. यासह दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत विजयाचा चौकार लगावला. 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ७ बाद ११५ धावा केल्या. सलामीवीर रेजा हेन्ड्रिक्स (४३) वगळता एकाही आफ्रिकन फलंदाजाला मोठा खेळी करता आली नाही. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद २७ धावा करून नेपाळला ११६ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने चांगली सुरुवात केली. पण, अनुभवाची कमी पुन्हा एकदा नेपाळला भासली अन् आफ्रिकेने तोंडचा घास पळवला. खरे तर नेपाळला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र शेवटचा चेंडू निर्धाव गेला. यष्टीरक्षरक क्विंटन डीकॉकने दुसऱ्या टोकाला चांगला थ्रो करून नेपाळच्या फलंदाजाला धावबाद करण्यात मदत केली अन् सुपर ओव्हर टळली. याशिवाय आफ्रिकेने निसटता विजय मिळवला.

बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला केवळ ११५ धावांत रोखण्यात नेपाळकडून कुशल भर्तेलने मोलाची भूमिका बजावली. त्याने त्याच्या ४ षटकांत केवळ १९ धावा देऊन ४ बळी घेतले, तर दीपेंद्र सिंह ऐरीने (३) बळी घेतले. आफ्रिकेने दिलेल्या ११६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळकडून सलामीवीर आसिफ शेखने ४२ धावांची संयमी खेळी केली. पण तो बाद होताच नेपाळचा डाव कोलमडला. त्याला अनिल साहने (२७) सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस दक्षिण आफ्रिकेने आपल्या अनुभवाचा वापर करत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. दक्षिणेकडून तबरेज शम्सीने सर्वाधिक चार बळी घेतले.

Web Title: WHAT A MATCH! Africa was beaten by the Asian team; 1 run short of a huge reversal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.