दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 20:13 IST2025-08-18T20:13:00+5:302025-08-18T20:13:45+5:30
एका सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहातील खोलीमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या खजुराहोमध्ये ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याची ओळख पटली असून, अनुराग असे त्याचे नाव आहे. ७ वर्षीय अनुराग खजुराहोमधील ज्ञान गंगा शाळेत शिकत होता. तो वसतिगृहातच राहत होता.
अनुराग वसतिगृहातील खोलीत झोपलेला होता. तो सकाळी उठला नाही. त्यामुळे त्याच्यासोबतच्या मुलाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे याची माहिती शाळा प्रशासनाला दिली गेली.
शरीरावर निळ्या खुणा
अनुरागच्या शरीरावर निळ्या खुणा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय त्याला कुठेही जखमी झालेल्या नाहीत. त्याला विषबाधा झाली असावी किंवा कुठल्यातरी किटकाने दंश केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे बमिठा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्याला कुठलाही आजार नव्हता
अनुरागचे वडील बबलू पटेल यांनी सांगितले की, त्याला महिनाभरापूर्वीच शाळेच्या वसतिगृहात आणून सोडले होते. त्याची प्रकृती व्यवस्थित होती. रविवारी रात्रीही तो चांगला होता. सकाळी ६ वाजता शाळेंना आम्हाला कळवलं की, त्याला बरं वाटत नाहीये. आम्ही घाईत रुग्णालयात पोहोचलो, त्याआधीच त्याचा मृत्यू झालेला होता. त्याला कुठलाही आजार नव्हता.