शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:50 IST

तरुण पालकांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याचा हट्ट करत होता.

तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यात बीएमडब्ल्यू कार न मिळाल्याने रागावलेल्या २१ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण त्याच्या पालकांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याचा हट्ट करत होता. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, ते शेतात काम करून आपलं घर चालवतात. त्यांनी मुलाला बीएमडब्ल्यू कारऐवजी स्विफ्ट डिझायर कार खरेदी करण्यास सांगितलं होतं. यामुळे नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्या केली.

सिद्दीपेट जिल्ह्यातील चटलापल्ली येथे ही भयंकर घटना घडली. बोम्मा जॉनी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, तरुणाने दहावीनंतर शिक्षण सोडलं होतं. त्याला दारूचं व्यसन होतं. त्याला चांगली लाईफस्टाईल हवी होती आणि तो त्याच्या पालकांकडे तशीच मागणी करत होता.

तरुणाच्या कुटुंबाकडे २ एकर जमीन आहे. तो शेतात काम करू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. याच काळात त्याला दारूचं व्यसन लागलं. रिपोर्टनुसार, तरुणाचं एक आलिशान घर आणि बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचं स्वप्न होतं. या कारणास्तव तो सतत त्याच्या कुटुंबावर दबाव आणत होता.

जॉनी कुटुंबावर सतत दबाव आणत होता. याच दरम्यान, त्याने आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक परिस्थितीचे कारण देत स्वस्त कार खरेदी करण्यास सांगितलं. त्यांनी मुलाला स्विफ्ट डिझायर कार घेतो असं सांगितलं. तरुणाचे वडील एका कार शोरूममध्ये गेले. जिथे त्यांनी  मुलाला स्विफ्ट डिझायर घेण्यास सांगितलं. 

नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात नेलं. तेथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस