दोन तरुणींवर हल्ला अन् अत्याचाराचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, निलंबित पोलिसाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:20 IST2026-05-07T20:03:04+5:302026-05-07T20:20:21+5:30

ओडिशात भयंकर प्रकार घडला असून जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला.

Suspended Cop Beaten to Death by Mob for Allegedly Misbehaving with Women on Outskirts of Bhubaneswar | दोन तरुणींवर हल्ला अन् अत्याचाराचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, निलंबित पोलिसाचे कृत्य

दोन तरुणींवर हल्ला अन् अत्याचाराचा प्रयत्न; जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, निलंबित पोलिसाचे कृत्य

Odisha Crime: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. दोन तरुणींना दुचाकीने धडक देऊन, त्यांना भररस्त्यात फरफटत नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नराधमांना जमावाने चांगलाच चोप दिला. संतप्त जमावाच्या या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. मृताची ओळख रेल्वे पोलीस दलातील निलंबित कॉन्स्टेबल म्हणून झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालिअंता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमपूर परिसरात ही घटना भरदिवसा घडली. दोन तरुणी आपल्या स्कूटरवरून जात असताना आरोपी सौम्य रंजन स्वाइन आणि ओम प्रकाश यांनी त्यांच्या दुचाकीने तरुणींना जोराची धडक दिली. धडक बसल्यामुळे तरुणी खाली पडल्यानंतर नराधमांनी त्यांना भररस्त्यात फरफटत नेले.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी ११:३० च्या सुमारास मी तिथून जात असताना मोठा आवाज झाला. मी मागे वळून पाहिले तर दोन तरुण मुलींवर हल्ला करत होते. एका मुलीचे डोके तो जमिनीवर आपटत होता, तर दुसरा नराधम एका मुलीला मिठी मारून भररस्त्यात तिचे जबरदस्तीने चुंबन घेत होता आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. मुली जिवाच्या आकांताने ओरडत होत्या."

जमावाच्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू

तरुणींचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. हा घृणास्पद प्रकार पाहून लोकांचा संयम सुटला. त्यांनी दोन्ही आरोपींना पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी मी पोलीस स्टेशनमध्ये काम करतो, माझे कुणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकीही दिली. मात्र, संतप्त जमावापुढे त्यांचे काहीच चालले नाही. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सौम्य रंजन स्वाइनचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मयत आरोपी सौम्य रंजन स्वाइन हा कटक रेल्वे पोलीस दलातील निलंबित कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. दुसरा आरोपी ओम प्रकाश हा सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी जखमी तरुणींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सशस्त्र दलाची एक तुकडी तैनात केली आहे. पोलिसांनी पीडित तरुणींच्या तक्रारीवरून विनयभंग, खुनाचा प्रयत्न आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title : ओडिशा: महिलाओं पर हमले के प्रयास में पूर्व पुलिसकर्मी की भीड़ द्वारा हत्या

Web Summary : भुवनेश्वर में, दो महिलाओं पर हमला करने और बलात्कार का प्रयास करने के आरोप में एक निलंबित रेलवे कांस्टेबल को भीड़ ने मार डाला और दूसरे को गंभीर रूप से घायल कर दिया। पीड़ितों को अस्पताल में भर्ती कराया गया है, और पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Odisha: Mob Kills Ex-Cop for Assaulting Women; Rape Attempt Foiled

Web Summary : In Bhubaneswar, a mob killed a suspended railway constable and severely injured another for allegedly assaulting two women and attempting rape. The victims are hospitalized, and police are investigating the incident.