Sushant Singh rajput Suicide : CBI चौकशीआधी आमचं ऐकून घ्या, राज्य सरकारने दाखल केले कॅव्हेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:49 PM2020-08-04T17:49:12+5:302020-08-04T17:50:03+5:30

Sushant Singh Rajput Suicide : राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. 

Sushant Singh Rajput Suicide: Listen to us before the CBI inquiry, the state government filed a caveat | Sushant Singh rajput Suicide : CBI चौकशीआधी आमचं ऐकून घ्या, राज्य सरकारने दाखल केले कॅव्हेट

Sushant Singh rajput Suicide : CBI चौकशीआधी आमचं ऐकून घ्या, राज्य सरकारने दाखल केले कॅव्हेट

Next
ठळक मुद्दे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. म

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांवर आगपाखड केली आहे. “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” असा सवाल गुप्तेश्वर पांडे यांनी विचारला आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत सिंग प्रकरणी चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. 


बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांना इतकाच अभिमान असेल. तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 50 दिवसांत काय केलं? काय चौकशी केली, हे सांगावे. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे असा आरोप पांडे यांनी केला.

 

सुशांत सिंग राजपूतला न्याय देणार. तपासासाठी मुंबईला आलेले पाटणा शहराचे एसपी विनय तिवारी यांना विलगीकरण का ठेवले गेले? एअरपोर्टवर इतके जण येतात, त्यांना विलगीकरणात ठेवलं जातं का? लोकांच्या मनातील शंका दूर करा” असेही गुप्तेश्वर पांडे म्हणाले. तर दुसरीकडे, पाटणाचे पोलीस महानिरीक्षक संजय सिंह यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. बिहारचे एसपी विनय तिवारी यांना गृह विलगीकरणातून सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहारच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन ठेवणे चुकीचं आहे. यातून काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसून येते. एनआयए, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. आता वेळ आली आहे, केंद्राने हस्तक्षेप करावा” अशी मागणी बिहारमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Listen to us before the CBI inquiry, the state government filed a caveat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.