चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:46 AM2020-08-26T00:46:25+5:302020-08-26T00:46:51+5:30

पिंकी डिकुना या १९९४ साली कामानिमित्त चर्चगेटला गेल्या होत्या.

The stolen gold chain was returned after 26 years | चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना

चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना

Next

नालासोपारा : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर ती परत मिळण्यासाठी आपण खूप वाट पाहतो. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून देतो. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर... धक्का बसेल ना? असा सुखद धक्का वसईच्या पिंकी डिकुन्हा या महिलेला बसला आहे. तब्बल २६ वर्षांपूर्वी ट्रेनच्या गर्दीत चोरीला गेलेली चेन पोलिसांनी पिंकी यांना घरी आणून दिली आहे.

पिंकी डिकुना या १९९४ साली कामानिमित्त चर्चगेटला गेल्या होत्या. लोकलची वाट पाहत असताना त्यांची चेन चोरून चोराने पळ काढला होता. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपी मोहंमद निजाम नासिर याला अटक केली आहे.

Web Title: The stolen gold chain was returned after 26 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.