स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:04 PM2021-05-10T19:04:01+5:302021-05-10T19:05:18+5:30

Suicide Case : गाडगेनगर ठाणे हद्दीतील घटना, आकस्मिक मृत्यूची नोंद

State Bank of India Deputy Bank Manager commits suicide by strangulation | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनमोल बाबूराव शहाणे (३७, रा. बियाणी चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


पोलीस सूत्रांनुसार, अनमोल शहाणे हे बियाणी चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियात डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. ते याच परिसरात प्रकाश देशमुख यांच्या घरी काही महिन्यांपासून कुटुंबासमवेत भाड्याने राहत होते. मद्याचे व्यसन जडल्याने ते नेहमी त्याच्या अमलात राहत होते. शनिवारी सकाळपासून अनमोल यांनी मद्यपानास सुरुवात केली. जेवण न केल्याने पत्नीशी किरकोळ वाद झाला. यानंतर ते बेडरूममध्ये गेले. रात्री ८.३० वाजता पत्नीला बेडरूमचे दार आतून बंद आढळले. त्यांनी दार ठोठावले तरी अनमोल यांनी दार उघडले नाही. त्यामुळे पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बेडरूमचे दार तोडले असता, अनमोल हे पाळण्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. चार वर्षांपूर्वी लोणार येथे कार्यरत असताना अनमोल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पत्नीने गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.

Web Title: State Bank of India Deputy Bank Manager commits suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.