Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:12 IST2025-06-17T17:01:54+5:302025-06-17T17:12:23+5:30

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजाचा भाऊ सचिन रघुवंशी याने खळबळजनक आरोप केले आहेत.

Sonam Raghuvanshi was accused of allegedly sacrificing her husband raja | Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

फोटो - आजतक

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजाचा भाऊ सचिन रघुवंशी याने खळबळजनक आरोप केले आहेत. भावाने धक्कादायक असा दावा केला आहे की, राजाचा मृत्यू हा सामान्य अपघात किंवा आजार नव्हता, तर तंत्र-मंत्रामुळे झालेला एक नरबळी होता, जो राजाची पत्नी सोनम रघुवंशीने तिच्या वडिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी केला होता.

सचिन रघुवंशीने दिलेल्या माहितीनुसार, "माझा भाऊ राजाचा बळी देण्यात आला आहे. सोनमने तिच्या वडिलांच्या आरोग्यासाठी हा नरबळी दिला आहे. तिच्या वडिलांना यापूर्वी दोनदा हार्ट अटॅक आला होता, परंतु आता ते पूर्णपणे निरोगी आहेत. प्रश्न असा आहे की, माझ्या भावाचा जीव एका ६० वर्षीय व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी घेतला गेला का?"

 "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

सचिनने असाही आरोप केला की, सोनम आणि तिचं कुटुंब तंत्र-मंत्र कार्यात सहभागी असलेल्या काही लोकांच्या संपर्कात होतं. सध्या या आरोपांवर सोनम रघुवंशीच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोनमच्या वडिलांनी आपल्या मुलीचा फोटो उलटा लटकवून जिवंत परत आणण्यासाठी काळी जादू केली, पण त्यांनी जावई राजा याच्या बाबतीत असं का केलं नाही?

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जर सोनमच्या कुटुंबाने राजाचा फोटो उलटा लटकवला असता तर माझा भाऊही जिवंत असता. सोनमच्या कुटुंबाला सल्ला कोण देत होतं आणि ते हत्येच्या कटाचा भाग होते का? सोनमचे आई-वडील या कटात सहभागी असू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील सचिन रघुवंशीने केली आहे. 
 

Web Title: Sonam Raghuvanshi was accused of allegedly sacrificing her husband raja